Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकण१ मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन शेतकरी मेळावा

१ मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन शेतकरी मेळावा

सावंतवाडी ( प्रतिनिधी ) : कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त तसेच श्री देवी पावणाई रवळनाथ फार्मर प्रोडूसर कंपनी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च रोजी कलंबिस्त ग्राम पंचायत येथे सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांच्या हस्ते होणार आहे. कृषी विषयक माहिती व शासकीय योजना यासंदर्भातही ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर पशुसंवर्धन योजनांबाबत ची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विद्यानंद देसाई पशुधन सहाय्यक आयुक्त अजित मळीक हे पशुसंवर्धन योजनांबाबत माहिती देणार आहेत. तर यावेळी नाबार्डचे जिल्हाधिकारी अजय थट्टे व गोकुळचे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे व विस्तार सुपरवायझर भगवंत गावडे तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कलंबिस्त पंचक्रोशीतील सर्व दुग्ध तसेच शेती बागायती शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना तसेच सिंधू रत्न योजनेची माहिती तसेच जिल्हा बँकेकडून दूध उत्पादन कुक्कुटपालन मत्स्य शेती आधी बाबत मार्गदर्शन व कर्जवाटप बाबतची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सपना सावंत तर उपसरपंच सुरेश पास्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी दूध व्यवसायिक उत्पादक शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामसेवक श्री. फाले व दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत व प्रोडूसर कंपनीचे प्रमोद नाईक व दिनेश सावंत आदींनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -