Monday, May 20, 2024
Homeमहामुंबईधारावीत सुनिर्मल फॉउंडेशनच्या वतीने सुनिर्मल गौरव पुरस्कार वितरण

धारावीत सुनिर्मल फॉउंडेशनच्या वतीने सुनिर्मल गौरव पुरस्कार वितरण

धारावी (प्रतिनिधी) : धारावीत सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने सुनिर्मल गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. सुनिर्मल फाऊडेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणारे साहित्यिक, पत्रकार, शिक्षक, वृत्तपत्रलेखक, डॉक्टर यांचा धारावीतील श्री गणेश विद्या मंदिरमध्ये सुनिर्मल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शिवाय गरीब आणि गरजू विदयार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटपही करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हूणन मुंबईचे माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, कवी, गजलकार अ. के शेख, सदस्य फिल्म सेंसॉर बोर्ड दिल्लीचे विलास खानोलकर, जेष्ठ शिक्षक तज्ञ व साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर, मुनीर खान, जेष्ठ समाज सेवक राजेश खंदारे महादेव शिंदे, शिवलिंग व्हटकर, रमेश कदम आदींची उपस्थिती होती.

यावेळी सुनिर्मल विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शशिकांत सावंत यांना सुनिर्मल पत्रकार भूषण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच डॉ.अ.ना.रसनकुटे-सुनिर्मल साहित्य गौरव पुरस्कार, महादेव खळूरे-शिक्षणभूषण, विजय सूर्यवंशी, दीपक पाटील, मिलिंद पाटील, विजय कदम, सचिन होळकर, गौतम जाधव, अशोक पा. कांबळे-शेर्पेकर, डॉ.अलका मोहन कदम, नितेश सरवणकर, कल्पना शिंदे, विजय चोघळा, महालिंग शेरखाने, शरद भालेराव, डॉ. संदीप डाकवे, कल्पनाताई, गिरीराज शेरखाने, किरण धुमाळ, गोविंद पाठक, शैलेश सोनावणे, प्रकाश पोळ, महेश शिगवण, सुनील म्हात्रे, सूर्यकांत गोवळे, डॉ.जगन्नाथ कांबळे, सत्यवान रेडकर, मनोहर जोगळेकर, एकनाथ बिरवटकर, राजेंद्र लंकेश्री, दिलीप शेडगे, सुधीर कनगुटकर, भारत कवितके, विलास देवळेकर, सनी आडेकर, यशवंत चव्हाण, मोहन जाधव, जयराम सोनवणे, पांडुरंग जाधव, दिनेश कांबळे, डॉ. सुशिल सिहं, उमेश मुणगेकर, शिवाजी फणसेकर, राजेश गांगुर्डे, गणपती शिंदे, दिनेश कावळे, अरविंद कटके, उल्लेश खंदारे, निरंजन आशर, कुमुद मनोहर शहाकार, सुरेश पोटे, रोहिणी पोळ, गाडेकर, अमोल धडके, रमेश राजपूत, डॉ. चंद्रकांत सावंत, शाम ठाणेदार, ख. र. माळवे, संजय शिंदे, बालाजी जाधव, रमाकांत बुद्धिसागर,अशोक शांती लांडगे इत्यादींना सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -