Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील गरजू मुलींना मिळणार सायकल

आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ११० शाळकरी मुलींना केले मोफत सायकल वाटप

या सामाजिक उपक्रमात पहिल्या टप्प्यात ३८० गरजू मुलींना देणार मोफत सायकल

कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी करण्यात आला. शुभारंभाला ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत सौ. नीलम राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, समीर नलावडे, संजना सावंत, मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, हर्षदा वाळके, प्रज्ञा ढवण, डॉ. अमोल तेली, संदीप मेस्त्री यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांच्या या उपक्रमाचा कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील शाळकरी गरजू मुलींना लाभ होणार आहे. त्याची सुरुवात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३८० सायकल मतदार संघात दिल्या जाणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलींसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

शाळेचे अंतर घरापासून लांब असल्याने आणि वाहतुकीची गैरसोय असल्याने अनेक शाळकरी मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. कित्येकदा शाळेत आणि शाळा सुटल्यावर घरी वेळेवर पोचता येत नाही. आता स्वतःच्या हातात सायकल असल्यामुळे या शाळकरी मुलींची वाहतुकीची गैरसोय दूर होणार असून त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी याचा फायदा होणार आहे. मोफत सायकलचा लाभ मिळणाऱ्या शाळकरी मुली आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमदार नितेश राणेंच्या या सामाजिक उपक्रमा बद्दल आभार मानले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -