Sunday, May 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDisease X : कोरोनानंतर आता आणखी एका महामारीचे संकट!

Disease X : कोरोनानंतर आता आणखी एका महामारीचे संकट!

कोरोनाहून ‘डिसीज एक्स’ सात पटीने अधिक घातक

वॉशिंग्टन : कोरोना महामारी मधून अजून जग सावरू शकलेले नाही. त्यात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काळात अजून एक महामारी जगावर येऊ शकते. ज्यात तब्बल पाच कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. ही महामारी कोरोनापेक्षाही घातक असल्याचे म्हटले जात आहे.

जागतिक आरोग्य परिषदेने या येणाऱ्या महामारीचे नाव ‘डिसीज एक्स’ (Disease X) असे ठेवले आहे.

‘डेली मेल’च्या एका रिपोर्टनुसार, कोविड-१९ ही एक सुरुवात आहे. येणाऱ्या महामारीत कमीत कमी पाच कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ब्रिटनमधील व्हॅक्सिन टास्कचे प्रमुख डेम केट बिंघम यांनी म्हटले आहे की, आपण नशीबवान आहोत की कोरोना घातक निघाला नाही. पण कोरोनाहून ‘डिसीज एक्स’ सात पटीने अधिक घातक होऊ शकतो. १९१८ आणि १९१९ साली आलेल्या फ्लूमुळे जगातील पाच कोटीहून अधिक नागरिकांचा जीव गमवावा लागला होता. येणारी महामारी ही त्यापेक्षा घातक असू शकते, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -