Saturday, May 4, 2024
Homeदेशदिग्दर्शक अली अकबर यांनी केला इस्लामचा त्याग

दिग्दर्शक अली अकबर यांनी केला इस्लामचा त्याग

आसुरी आनंदाचा निषेध म्हणून धर्मत्यागाचा निर्णय

तिरुअनंतपुरम : ख्यातनाम मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर काही मुस्लीमांकडून आसुरी आनंद व्यक्त करण्यात आला होता. या प्रवृत्तीच्या निषेधार्थ आली अकबर यांनी इस्लामचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.

दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडिओवर आक्षेपार्ह कमेंटमुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर अली अकबर यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले. अकबर म्हणाले, ”ज्यांनी इमोजी टाकल्या त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर पाच मिनिटांतच खाते ब्लॉक करण्यात आले. मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या ‘देशद्रोही’ अशा कृतींना विरोध केला नाही आणि हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे.

फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केलेल्या व्हिडीओत अली अकबर म्हणाले की, ”आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध हजारो हसतमुख इमोजी पोस्ट करणाऱ्या लोकांना हेच माझे उत्तर आहे,” असे अकबर यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ‘सोशल मीडियावर अनेक देशविरोधी कारवाया होतात आणि रावत यांच्या मृत्यूवर हसणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हसत इमोटिकॉनसह कमेंट करणारे आणि रावत यांच्या मृत्यूची बातमी साजरी करणारे बहुसंख्य वापरकर्ते मुस्लिम होते. रावत यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि अतिरेक्यांविरुद्ध अनेक कारवाया केल्या होत्या. एका धाडसी अधिकाऱ्याचा आणि देशाचा अपमान करणाऱ्या या सार्वजनिक पोस्ट्स पाहिल्या तरी, एकाही मोठ्या मुस्लिम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नसल्याचे अकबर यांनी सांगितले.

अकबर यांच्या या पोस्टवर फेसबुकवरील मुस्लिम समाजाकडून तीव्र टीका झाली आणि काहींनी अपमानास्पद भाषा देखील वापरली. दरम्यान, अनेक युजर्सने अकबर यांना पाठिंबा दिला आणि अकबर यांना शिवीगाळ करणाऱ्या नेटकऱ्यांना फटकारले. ही पोस्ट नंतर फेसबुकवरून काढून टाकण्यात आली असली तरी ती व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. नंतर, अकबर यांनी आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटले, “सीडीएसच्या मृत्यूवर हसणाऱ्यांना राष्ट्राने ओळखले पाहिजे आणि त्यांना शिक्षा केली पाहिजे.” या पोस्टवरही त्यांना पाठिंबा देणाऱ्या तसेच विरोधी कमेंट करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -