Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीDhule bribing news : सापळा रचला आणि धुळ्यात अभियंत्याला लाच स्विकारताना पकडले...

Dhule bribing news : सापळा रचला आणि धुळ्यात अभियंत्याला लाच स्विकारताना पकडले रंगेहाथ

वाढीव बांधकामाचा नकाशा मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच

धुळे : धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील (Dhule Industrial Estate) कारखान्याच्या वाढीव बांधकामाचा नकाशा मंजूर करून देण्यासाठी तब्बल २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सल्लागार अभियंत्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत (Dhule bribing news).

या संदर्भात तक्रार करणारे व्यावसायिक हे धुळे येथील रहिवासी असून त्यांचा औद्योगिक वसाहती मधील भूखंड आहे. या भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्याकरता नकाशा मंजूर होण्यासाठी त्यांनी औद्योगिक वसाहतीचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज सादर केला होता. यासाठी चलनाद्वारे आवश्यक ती रक्कम देखील भरण्यात आली होती. मात्र अर्ज सादर करून बराच कालावधी उलटल्यानंतर देखील त्यांच्या अतिरिक्त बांधकामाचा नकाशा मंजूर न झाल्याने ते कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले. यावेळी सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी यांच्या समवेत त्यांची भेट झाली. यावेळी तक्रारदार व्यावसायिकाला औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयामध्ये आपली ओळख असून या कार्यालयातून बांधकाम मंजुरीचे काम करून देतो. पण त्या मोबदल्यात २५ हजार रुपयाची लाच अन्सारी यांनी मागितली. त्यामुळे संबंधित तक्रारदार व्यावसायिकाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून ही तक्रार दिली.

उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी पंच पाठवून पैशांची मागणी झाल्याची बाब पडताळून पाहिली. त्यानंतर औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाजवळ पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मनजितसिंग चव्हाण व रूपाली खांडवी तसेच राजन कदम, शरद काटके, मकरंद पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला. यावेळी तक्रारदार व्यवसायिकाकडून २५ हजारांची रोकड स्वीकारत असताना अन्सारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -