Saturday, May 18, 2024
HomeदेशRam Mandir : श्रीरामांसाठी भक्तगण करतायत भरभरून दान, दिवसातून दोनदा रिकामी करावी...

Ram Mandir : श्रीरामांसाठी भक्तगण करतायत भरभरून दान, दिवसातून दोनदा रिकामी करावी लागते दानपेटी

मुंबई: राम मंदिराच्या(ram mandir) प्राण प्रतिष्ठेला ११ दिवस झाले आहेत. अभिषेक समारंभानंतर साधारण २५ लाख भक्त आतापर्यंत राम जन्मभूमीमध्ये दर्शन घेऊन झाले आहेत. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० दिवसांत दान पेटींमध्ये तब्बल ८ कोटी रूपये जमा झाले आहे आणि साधारण ३.५० कोटी लोकांनी ऑनलाईन पद्धतीने दान दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गर्भगृह जिथे देव विराजमान आहे त्यांच्यासमोर दर्शन पथाजवळ चार मोठ्या आकाराच्या दान पेटी ठेवण्यात आल्या आहेत. यात भक्तगण दान करत आहेत. याशिवाय १० संगणकीकृत काऊंटरवरही लोक दान करत आहेत.

सर्व दान काऊंटवरवर मंदिर ट्रस्टचे कर्मचारी नियुक्त कऱण्यात आले आहेत. संध्याकाळी काऊंटर बंद झाल्यानंतर मिळालेली रक्कम ही ट्रस्ट कार्यालयात जमा केली जाते. १४ कर्मचाऱ्यांची एक टीम चार दान पेटींमध्ये आलेल्या दानाची गणना करते. यात ११ बँक कर्मचारी आणि तीन मंदिर ट्रस्टचे कर्मचारी सामील आहे.

दान राशी जमा कऱण्यासोबतच ते त्याच्या गणनेपर्यंत सर्व काही प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली केली जाते.

भक्तांना श्रीरामांचे दर्शनपथावर बिजोलिया दगड लावले आहेत. तज्ञांनी दावा केला आहे की साधारण ५ लाख स्क्वे फूट वर्गात या बिजोलिया दगडांवर भक्तगण प्रत्येक मोसमात आरामात चालू शकतात.

श्रीरामांच्या दर्शनासाठी दरदिवसाला २ लाखाहून अधिक भक्तगण येत आहेत. गेल्या ११ दिवसांत राम मंदिरात दर्शनासाठी तब्बल २५ लाखाहून अधिक भक्त येऊन गेले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -