मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी टीव्हीवर पाहिला आणि सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन २० डिसेंबरपासून रात्री 10.30 वाजता सोमवार ते शनिवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
मात्र यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे? याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे.
सोमवारपासून ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय..तसंच येत्या रविवारी देवमाणूसचा एका तासाचा विशेष भाग स्मॉल स्क्रीनवरील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…
मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…
SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…
मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…