Friday, May 17, 2024
Homeमहामुंबईविद्यापीठ संकुलातील कलिना कॅम्पसमध्ये डेंग्यूच्या अळ्या

विद्यापीठ संकुलातील कलिना कॅम्पसमध्ये डेंग्यूच्या अळ्या

अर्धवट अवस्थेतील अनेक वास्तू विनावापर धुळीत

मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे मुंबई विद्यापिठाच्या कलिना कँम्पसमधे कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधून पुर्ण झालेल्या किंवा अर्धवट अवस्थेत असलेल्या अनेक वास्तू विनावापर धुळ खात पडलेल्या आहेत. चुकीच्या बांधकामामुळे स्विमिंग पुलही अनेक वर्ष अर्धवट अवस्थेत आहे. विद्यापीठ संकुलात डेंगुच्या अळ्या सापडत आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कलिना कॅम्पसमधील विकास कामे अर्धवट सोडून विद्यापिठाच्या कुलगुरुंनी मात्र सिंधुदुर्गात भूमी पूजन व इमारत उद्घाटनाचा घाट घातल्याची टीका युवासेनेकडून करण्यात आली आहे. स्विमिंग पूलचे काम हे आपल्या काळात झाले नाही, परंतु त्याची डागडुजी आपल्या कालावधीत करणे ही आपली नैतिक जवाबदारी होती, हे सर्व अतिशय निंदनीय तर आहेच, पण विद्यार्थ्यांच्या पैशांचा अपव्यय देखिल असल्याचे युवा सेनेच्या सीनेट सदस्यांनी म्हटले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर स्विमिंग पूल बांधकामावर केलेला करोडो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेल्याच कुलगुरुंनी त्वरीत जाहीर करुन संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी युवासेना सीनेट सदस्यांनी केली आहे. या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या विद्यापीठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -