Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीसेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित काम

सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित काम

  • डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

मी माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा भारतमाता जागृत होताना बघतोय. आपली भारतमाता विश्वगुरू म्हणून पुन्हा विराजमान होईल. मी प्रत्येक भारतीयांच्या कल्याणासाठी मानवतेच्या नात्याने सेवा करीन. सेवा आणि सुशासन आणून भारताचा वारसा जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरवेन” नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना दिलेले वचन आहे. आठ वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीकडे पाहताना प्रचिती आज दिसत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण जागतिक संकटावर मात करण्यासाठी भारताने केलेली आगेकूच विचारात घेऊन संबंध जग भारताकडे आकर्षित झालेय. स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वानुसार देश आज महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असून मोदीजींच्या सक्षम नेतृत्वामुळे स्वामी विवेकानंदांच्या स्वर्णिम भारताचे स्वप्न साकार होत आहे.

प्रत्येक धोरण, प्रत्येक नवीन उपक्रम ‘शेवटच्या व्यक्ती’च्या समस्यांवर केंद्रित असायला हवा. प्रदीर्घ काळापासून भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्राला तीन प्रमुख समस्यांनी ग्रासले आहे. त्यापैकी, दारिद्र्य, अपुऱ्या व गुणवत्तापूर्ण सुविधांचा अभाव यांच्यात उच्च तफावत असल्याने गेल्या ८ वर्षांत भारतातील विशेषतः अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल ग्रामीण नागरिकांना परवडणारी, सुरक्षित आणि कार्यक्षम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोदी सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न करत ‘‘सर्वे भवतु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः! ’’ हे बोधवाक्य खऱ्या अर्थाने सार्थकी लावले.

सन २०२१ मध्ये वैद्यकीय शिक्षणातील सुधारणांमुळे भारतातील डॉक्टर-रुग्ण गुणोत्तर स्तर सुधारला आहे व वैद्यकीय सेवेची गुणवत्ताही वाढली आहे. गरीब आणि वंचित लोकसंख्येला मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने, सरकारने २०१८ मध्ये महत्त्वाकांक्षी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (pmjay) सुरू केली. AB-PMJAY ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा/ आश्वासन योजना असून जी पूर्णपणे सरकारद्वारे वित्तपुरवठा केली जाते. PMJAY अंतर्गत, सर्व पात्र लाभार्थी यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आणि पेपरलेस दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील आरोग्य सेवा पुरविली जाते. या योजना अंतर्गत १० कोटींहून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबे, सुमारे ५० कोटी नागरिक समाविष्ट झाले आहेत, जे भारताच्या लोकसंख्येच्या ४० टक्के आहेत. PMJAY योजना ही सर्वसामान्यांसाठी संजीवनी असून यामुळे आरोग्य सुविधेत गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. आतापर्यंत १८.१६ कोटींपेक्षा जास्त लाभार्थी असून ३.३१ कोटी लाभार्थ्यांनी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. ही योजना २७ विविध वैशिष्ट्यांअंतर्गत १९४९ उपचार पॅकेजस प्रदान करते. ज्यात २७,८९१ सरकारी रुग्णालयाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी साखळी असून त्यापैकी १२५७२ खासगी देखील रुग्णालयांनी सहभाग नोंदवला आहे. PMJAY ने केवळ गरिबांनाच आवश्यक दिलासा दिला नाही, तर भारतासाठी सार्वत्रिक आरोग्य क्षमता मिळवण्याचा मार्गही सुरू केला आहे.

गेल्या आठ वर्षांत, सरकारने विशेषतः महिला आणि मुलांसाठी आरोग्य निर्देशांक सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले असून गरोदर मातांचे आरोग्य वाढवण्यासाठी, सरकारने जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान यांसह अनेक धोरणे आणली आहेत. या योजनेमध्ये गर्भवती महिलांना मोफत पोषण सहाय्य, औषधे, निदान, उपचार आणि रुग्णवाहिका सुविधा तसेच अति जोखमीची गर्भवती महिलांना विशेष मोफत प्रसूतीपूर्व व पश्चात आरोग्य सुविधा पुरविणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे. तसेच ० ते १ वर्षं वयोगटातील बालकांना मोफत उपचार केले जातात, तद्नंतर १८ वर्षं वयोगटापर्यंत nhm अंतर्गत rbsk च्या माध्यमातून दुर्धर आजारांसाठी केंद्र सरकारने मोफत उपचाराची सोय केली आहे. व कुपोषित बाळकांसाठी vetc, etc व nre सेंटरमार्फत आरोग्य असुविधा पुरवली जात आहे.

पंतप्रधानांनी कमी किमतीत उच्च दर्जाची औषधे उपलब्ध असल्याचे सांगितल्याप्रमाणे, देशभरात हजारो जनऔषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जिथे बाजारभावाच्या तुलनेत ५०%-९०% स्वस्त दरात औषधे विकली जात आहेत. याचा फायदा गरिबांनाच नाही तर मध्यमवर्गीयांनाही झाला आहे. ३१ जानेवारी २०२२पर्यंत जनऔषधी स्टोअरची संख्या ८६७५ पर्यंत वाढली आहे. PMB.JP अंतर्गत, देशातील सर्व ७३९ जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. २०२० मध्ये टीबी मुक्त भारत मोहीम सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये टीबीसाठी जनआंदोलन सुरू करण्यात आले होते.

क्षयरोगाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे, रोगाविषयी गैरसमज व सामाजिक कलंक दर करणे आणि राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत सर्व दूर उपलब्ध टीबी सेवा केंद्रामध्ये उपचार वाढवणे ही संकल्पना होती. क्षयरोग निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी योजना स्थापन करून, पंतप्रधान मोदीजी यांनी २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे वचन दिले आहे.

कोविड काळात आपल्या लढ्याने त्यांनी दाखवून दिले आहे की, नवा भारत हा ‘आत्मनिर्भर’ भारत आहे आणि जबाबदार सरकार आणि ‘जन भागीदारी’च्या सामर्थ्याने कोणत्याही आव्हानांवर मात करण्यास नेहमीच सक्षम आहे. गेली आठ वर्षे अवघ्या जगाला भुरळ घालणारे यशस्वी लोकभिमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकुशल व गतिमान नेतृत्वाखाली सरकारच्या कर्तृत्व आणि यशाच्या युगाचे साक्षीदार आहेत. आरोग्याच्या मूलभूत व पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. आणि वैद्यकीय सेवांमधील सरकारी सुविधांच्या विस्तारामुळे आरोग्यसेवेवरील सामान्य माणसाचा खर्च झपाट्याने कमी होत आहे.

मी आरोग्य मंत्री असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठले कुठले चांगले दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले याचा ऊहापोह केला; परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारताच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने अनेक वर्षांपासूनचा वाद मिटवून राममंदिराचे काम चालू झाले. कलम ३७० हटवले, तिहेरी तलाक कायदा संमत केला. भारतीय सेनेचे आधुनिकीकरण केले, लडाख अरुणाचल सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे तयार केले, वायुदलासाठी राफेल खरेदी केले, विक्रांतचे जलावतरण झाले. शेतकऱ्यांसाठी किसान सम्मान योजना आणली, नवीन संसद भवन झाले, चंद्रयान मंगळयान योजना कार्यान्वित केली, कोरोनाची लस भारतात तयार केली नसती, तर आज लसीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागले असते. एवढ्या कमी कालावधीत २०० कोटींपेक्षा जास्त मोफत लसीचे डोस लोकांना मिळाले. चिनाब ब्रिज झाला, बोगीबिल ब्रिज झाला. नॅशनल पोलीस मेमोरियल झाले, अटल टनल पूर्ण झाला. सोलर ऊर्जेत भारत स्वयंपूर्तीकडे वाटचाल करतोय, सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सेनेला CDS कार्यप्रणाली निर्माण केली. सेनेला “वन रँक वन पेंशन” दिली. सेनेचे “नॅशनल वाॅर मेमोरियल” तयार झाले. रेल्वेचं आधुनिकीकरण व विद्युतीकरण एवढ्या वेगाने केले. जम्मू, काश्मीर व लडाख तीन वेगळी राज्ये करून जम्मू-काश्मीरमध्ये “एक निशान, एक प्रधान, एक संविधान” पारित केले,आतंकवादावर अंकुश लागला “मेक इन इंडिया” कार्यक्रम सुरू केला, आत्मनिर्भर भारत” संकल्पना ,‘‘स्टार्ट अप भारत’’ ही संकल्पना आणल्याने आज १०० च्या वर स्टार्ट अॅपचे युनिकाॅर्नमध्ये रूपांतर झाले, युक्रेनमधून २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी व नागरिक तत्परतेने सुखरूप परत आणले. गरिबांसाठी जनधन योजना आणली. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब ७ कोटींपेक्षा जास्त महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले, खादीचा आग्रह धरल्यामुळे खादी ग्रामोद्योगाला नवसंजीवनी मिळाली. भव्यदिव्य काशी विश्वनाथ काॅरिडाॅर तयार झाला. नमामी गंगे प्रोजेक्टमुळे झालेली गंगा सफाई झाली. सागरमाला प्रोजेक्टमुळे सुरू झालेली नद्यांमधुन दळणवळण व्यवस्था सुरू झाली. सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले. प्रत्येक दिवाळीला सेनेच्या वेगवेगळ्या बटालियनमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर राहुन सैनिकांचे मनोबल वाढवले. मोदींना मिळालेल्या भेटवस्तू लिलाव करून तो निधी “नमामि गंगे” प्रकल्पाला दिला. अजूनही सांगण्यासाठी खूप आहे असा कार्यकुशल दूरदृष्टी असलेला पंतप्रधान आपल्या भारताला मिळाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला मिळाले ्याचा मला अभिमान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -