Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीखळबळजनक घटना, पाण्यात सापडला हातपाय बांधलेला मृतदेह

खळबळजनक घटना, पाण्यात सापडला हातपाय बांधलेला मृतदेह

नांदूर शिंगोटे बायपास लगत आढळली बेवारस दुचाकी

नांदूर शिंगोटे (प्रकाश शेळके /रश्मी मारवाडी) – नांदूर शिंगोटे येथे बायपास लगत असणाऱ्या बंधाऱ्यात हात बांधलेला आणि तोंडात कापसाचा बोळा कोंबलेल्या अवस्थेत पंचवीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या ठिकाणी दोन ते तीन दिवसापासून बेवारस स्थितीत उभी असलेली दुचाकीही आढळली.

हा तरुण लामखेडे मळा तारवाला नगर पंचवटी नाशिक येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नांदूर शिंगोटे येथील बायपास रस्त्यालगत असलेल्या बंधाऱ्यात पूर्णपणे पाणी भरलेले असल्याने मंगळवारी बंधाऱ्यालगत
राहत असलेल्या शेतकरी उत्तम शेळके यांना पाण्यावर डोकेबाहेर असलेला मृतदेह आढळला त्यांनी त्वरित याबाबतची घटना पोलिसांना कळविली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आसपासच्या ठिकाणी पहाणी केली.

याबाबत वावी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी संपूर्ण परिसर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाहणी करून घेतला असता पाण्यावर तरंगणाऱ्या आणि हात बांधलेल्या स्थितीत मृतदेह सापडला. लोखंडे यांनी ही घटना वरिष्ठ पातळीवर आपल्या वरिष्ठांना कळविली. त्यानंतर नाशिक येथून फॉरेन्सिक तज्ञांना बोलवण्यात आले हे पथक आल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने या ठिकाणी पाण्यावर तरंगणारा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्यानंतर त्याची पूर्ण पाहणी केली.

त्याचप्रमाणे सोमवारी सकाळपासून घटनास्थळाच्या जवळच नाशिक-पुणे महामार्गावर या ठिकाणी बेवारस अवस्थेत एम एच १५ एफ एच ५४३७ या क्रमांकाची पांढऱ्या कलरची एक्टिवा उभी होती. याबाबतही स्थानिक रहिवासी व शेतकरी लोकांनी पोलिसांना माहिती कळविली. सदरच्या गाडीची चौकशी केली असता ती दिंडोरी रोड पंचवटी येथील असल्याचे समजले त्या गाडी मालकाकडे चौकशी केली असता सदरच्या मृत व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली. गौरव संपत नाईकवाडे असे त्याचे नाव आहे. तसेच गाडी घेऊन तो रविवारपासून घरीच आला नसल्याचे समजले.

सदरचा प्रकार घातपाताच्या प्रकारातून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर तरूणाच्या मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथे पाठविण्यात आला. निफाड पोलीस स्टेशनचे अधिकारी निलेश पालवे यांचे मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे चेतन लोखंडे व इतर कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमुळे नांदुर-शिंगोटे सह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -