Monday, May 13, 2024
HomeदेशCyclone Michaung: मिचाँग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट ,चेन्नईत ५ जणांचा...

Cyclone Michaung: मिचाँग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट ,चेन्नईत ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: देशातील दाक्षिणात्या राज्यात मिचाँग चक्रीवादळाचा(Cyclone Michaung)कहर पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्घटनामध्ये कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रनवेवर पाणी भरल्याने विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी या वादळाचे गंभीर चक्रीवादळात रुपांतर झाले आणि मंगळवारी सकाळी दक्षिणी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला पार करण्याची शक्यता आहे.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिचाँग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यांनी या स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले.

अमित शाह यांची सोशल मीडियावर पोस्ट

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत मिचाँग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच त्यावरील उपायांबाबक चर्चा झाली. लोकांचा जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता आहे. केंद्र सरकार आँध्र प्रदेशला सर्व हवी ती मदत पुरवण्यासाठी तयार आहे. राज्यात एनडीआरएफचे जवान आधीच कमी आहेत. गरज पडल्यास आम्ही मदतीसाठी आणखी टीम्स तयार ठेवल्या आहेत.

रस्त्यावर आल्या मगर

चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने येथे रस्त्यांवर मगरी पाहायला मिळाल्या. याशिवाय शहरातील अनेक मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचले . सेंट थॉमस मेट्रो स्टेशनवर ४ फुटांपर्यंत पाणी जमा झाले होते. स्टेशनमध्ये घुसण्याचा मार्गच बंद ाला.

हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

५ डिसेंबरला आयएमडीने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मलकानगिरी, कोरापूट, रायगडा, गजपती आणि गंजम या पाचा जिल्ह्यामधील एक अथवा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -