Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीCyber Crime : वर्धा नागरी सहकारी बँक सायबर हल्ल्यात पाच आरोपींना अटक

Cyber Crime : वर्धा नागरी सहकारी बँक सायबर हल्ल्यात पाच आरोपींना अटक

तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये विविध खात्यांत वळवले

वर्धा : अकाऊंट हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांचे (Cyber crime) प्रमाण वाढले असून वर्ध्यातून आणखी एक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्ध्यातील वर्धा नागरी सहकारी बँकेचं (Wardha Nagri Sahakari Bank) अकाऊंट हॅक (Account hack) केल्याची ही घटना होती. या घटनेत आरोपांनी शक्कल लढवत येस बँकेची (Yes Bank) युटिलिटी हॅक करुन बँकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेच्या खात्यातून १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे.

येस बॅंकेत वर्धा नागरी सहकारी बॅंकेच्या असलेल्या खात्यातून आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) व्यवहार होत असत. वर्धा बॅंकेला २४ मे रोजी बुधवारी सुट्टी होती. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी पहाटे ६ ते सकाळी ८ या चार तासांत येस बॅंकेची युटिलीटी (Utility) हॅक करुन सायबर हल्ला केला. यामध्ये वर्धा नागरी बँकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली.

सकाळी बँकेत आलेल्या कर्मचा-यांनी नेहमीप्रमाणे कामासाठी संगणक (Computers) सुरु केले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी कांचन अनिल केळकर यांनी या कर्मचा-याने ताबडतोब वर्धा शहर पोलिसात (Wardha Police) गुन्हा दाखल केला. सायबर सेलकडून (Cyber cell) पुढील तपास करण्यात आला. यातील नायजेरियन नागरिक असलेला आरोपीच या हॅक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

५० ते ६० अकाऊंटमध्ये रक्कम ट्रान्सफर

आरोपींनी ही रक्कम ५० ते ६० वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर (Money Transfer) केली होती. मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, तेलंगणा, आसाम, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आदी ठिकाणच्या २४ ते २५ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले होते. यात पोलिसांनी २३ लाख १० हजार रुपये थांबवले आहेत. जवळपास ६० अकाऊंट गोठवले आहेत. १६ एटीएम (ATM), ९ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी वर्धा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

तपासासाठी आरबीआयची पाच पथके पाच ठिकाणी

या प्रकरणाच्या तपासासाठी आरबीआय टीमची (RBI Team) पाच पथके पाच दिवस वर्ध्यात होती. वर्धा, बंगळुरु, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद अशा पाच ठिकाणी ही पथके तैनात होती. वेगवेगळ्या टीमच्या कौशल्यपू्र्ण कामगिरीमुळे घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. येस बँकेच्या सर्व्हरचा (Server) आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) हॅक करणारा बंगळुरुमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलं. तर दिल्ली इथून दोन आणि मुंबई इथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -