Saturday, May 18, 2024
HomeदेशCorona Updates : इटली-अमृतसर विमानातील १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Corona Updates : इटली-अमृतसर विमानातील १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

अमृतसर : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली.

अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. त्यांचे नमुने घेऊन ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढिंडसा, माजी मंत्री मनोरंजन कालिया, अमृतसर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुरप्रीत सिंग खैहरा आणि महापालिकेचे आयुक्त संदीप रिषी, पतियाळाचे जिल्हाधिकारी संदीप हंस, एडीसी गुरप्रीत सिंग थिंद यांच्यासह अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -