Sunday, May 19, 2024
HomeदेशNarendra Modi : ज्या नेत्यांच्या नीतीची काही गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर...

Narendra Modi : ज्या नेत्यांच्या नीतीची काही गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर कसे प्रश्न उपस्थित करतात?

राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर ‘त्या’ प्रथा का बदलल्या नाहीत?; पंतप्रधानांचा काँग्रेसला सवाल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) आपली बाजू किती बळकट आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत (Rajya Sabha) बोलताना विरोधी पक्ष काँग्रेसवर (Congress) घणाघाती टीका केल्या. काँग्रेसच्या आजवरच्या भ्रष्टाचारावर तसेच नाकर्तेपणावर बोट ठेवत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने दहा वर्षात अर्थव्यवस्थेची किती प्रगती केली? १२ वरुन ११ व्या क्रमांकावर. पण आम्ही पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणली आहे. हे काँग्रेसवाले आम्हाला अर्थव्यवस्थेवर शिकवत आहेत. काँग्रेसने ओबीसींना आरक्षणही नीट दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न देण्यास योग्य नाहीत असं ज्यांना वाटत होतं आणि ज्यांनी आपल्याच कुटुंबातल्या लोकांना भारतरत्न पुरस्कार दिले असे लोक आम्हाला उपदेश देत आहेत. सामाजिक न्याय या विषयावर आम्हाला ते शिकवत आहेत. ज्या काँग्रेसच्या नेत्यांची गॅरंटी नाही, नीतीची काही गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्न कसे काय उपस्थित करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच ठणकावले.

पुढे ते म्हणाले, देश आणि जग काँग्रेसच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाकडे असं का पाहतो? देशाला यांचा इतका राग का आला? ही यांच्याच कर्माची फळं आहेत. जे काही करणार त्याची फळं इथेच भोगायची आहेत. आम्ही लोकांना सांगितलं नाही की तुम्ही यांच्याविषयी असं बोला. लोकच यांच्याविषयी बोलत आहेत.

आजार माहित असून त्यावर काहीच सुधारणा केल्या नाहीत

मी एक म्हणणं वाचून दाखवतो. ‘सदस्यांना माहीत आहे की आपली ग्रोथ कमी झाली आहे. महागाईचा दर वाढतो आहे. करंट अकाऊंट डेफिसिट आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच गेलंय.’ हे म्हणणं माझं नाही मनमोहन सिंग यांचं हे म्हणणं आहे. देशाची अवस्था काय हे त्यांनी सांगितलं होतं. मी आता दुसरं म्हणणं वाचून दाखवतो. ‘देशात खूप राग आहे, सरकारी संस्थांचा गैरवापर होतो आहे.’ असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. आता मी तिसरं म्हणणं मांडतो, ‘टॅक्स कलेक्शनमध्ये भ्रष्टाचार होतो, त्यामुळे जीएसटी आणला पाहिजे. गरीबातला गरीब हा आणखी गरीब होतोय त्याला त्यातून बाहेर काढलं पाहिजे. सरकारी कंत्राटं जशी दिली जात आहेत त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत ही पद्धतही बदलली पाहिजे.’ हे देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते. त्यांच्या आधी एक पंतप्रधान म्हणाले होते की दिल्लीतून मी १ रुपया पाठवतो पण पोहचतात १५ पैसे. आजार काय हे माहीत होतं. पण त्यावर सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर ‘त्या’ प्रथा का बदलल्या नाहीत?

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळूनही देशात गुलामगिरीची मानसिकता कुणी वाढवली? जर तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर दंड संहिता जी इंग्रजांनी तयार केली होती ती बदलली का नाही? इंग्रजांच्या काळातले शेकडो कायदे का बदलले नाही? लाल बत्ती संस्कृती किती दशकं देशात सुरु होती? भारताचं बजेट संध्याकाळी पाच वाजता मांडलं जात होतं कारण ब्रिटन संसदेत त्यावेळी सकाळचे नऊ वाजलेले असत. त्या वेळेला अनुसरुन ही परंपरा सुरु होती. इंग्रजांपासून प्रेरणा घेतली नव्हती तर मग सैन्यांच्या चिन्हांवर गुलामीची प्रतीकं का होती? तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यासाठी मोदींची वाट देशाला का बघावी लागली? अंदमान आणि निकोबार या द्विपसमूहांवर इंग्रजी सत्तेचं निशाण का होतं? या देशातल्या सेनेचे जवान देशासाठी शहीद होते मात्र तुम्ही वॉर मेमोरियल का केलं नाहीत? इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर मग भारतीय भाषांकडे हीन भावनेने का पाहिलं? तुम्ही जर इंग्रजांच्या प्रभावाखाली नव्हता तर भारताचा उल्लेख कुठेही मदर ऑफ डेमोक्रसी का केला नाहीत? देश हे काहीही विसरलेला नाही, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -