Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीCommercial LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारचं आता पोस्ट रक्षाबंधन गिफ्ट!...

Commercial LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारचं आता पोस्ट रक्षाबंधन गिफ्ट! व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीतही घट…

जाणून घ्या कोणत्या राज्यात गॅसचे काय दर?

नवी दिल्ली : रक्षाबंधनच्या आदल्याच दिवशी एक आनंदाची बातमी देत केंद्र सरकारने (Central Government) गृहिणींना खुश केलं होतं. घरगुती गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी करण्याच्या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात गृहिणींच्या डोक्यावरील भार थोडा कमी झाला. आता केंद्र सरकारने पोस्ट रक्षाबंधन गिफ्टही जाहीर केलं आहे. ते म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Gas cylinder) किंमतीत कपात करण्यात आली आहे. १९ किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १५८ रुपयांनी कमी झाली आहे. आजपासून म्हणजेच १ सप्टेंबर २०२३ पासून नवा दर लागू करण्यात आला आहे.

घरगुती गॅसच्या कमी दरासोबतच उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ७५ लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे, ही आनंदाची बाब आहे.

कोणत्या राज्यात घरगुती व व्यावसायिक गॅसची काय किंमत?

तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एलपीजी ग्राहकांना नवी दिल्लीत (New Delhi) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी १,५२२ रुपये मोजावे लागणार आहेत, तर घरगुती सिलेंडरची किंमत ९०३ रुपये आहे. कोलकात्यात (Kolkata) १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १६३६ रुपये, तर घरगुती १४.२ किलो सिलेंडर ९२९ रुपयांनी विकला जातोय. मुंबईत (Mumbai) व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १४८२ रुपये आणि घरगुती सिलेंडरची किंमत ९०२.५० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये (Chennai) व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १६९५ रुपये तर घरगुती सिलेंडरची किंमत ९१८.५० रुपये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -