मुंबईत गारठा वाढला, पारा आणखी घसरणार का?

Share

मुंबई : मुंबईत आज, गुरुवारी सकाळी थंडीचा जोर वाढल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली. दुपारपर्यंत हवेत गारवा होता. मुंबईत या मोसमात पहिल्यांदाच किमान तापमानाने निचांकी गाठली.

फारशा थंड हवेची सवय नसलेल्या मुंबईकरांना पारा १८ अंशांखाली गेला तरी गारव्याची जाणीव होते. मुंबईमध्ये सध्या गारठा आहे. गेल्या आठवड्यात १९ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होते.

त्यानंतर सोमवारपासून पारा आणखी खाली घसरू लागला. सांताक्रूझमध्ये नोंद झाल्यानुसार, गेले दोन दिवस १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर गुरुवारी सकाळी पारा १८ अंशांच्या खाली उतरला. यंदाच्या ऋतुमधील हे मुंबईतील सर्वात कमी तापमान आहे.

‘ऑक्टोबर हिट’ने हुलकावणी दिली, मात्र ती कसर नोव्हेंबरमध्ये भरून काढली. नोव्हेंबरमध्ये किमान तापमानाचा पारा २५ अंशांपलीकडेही काही वेळा गेला होता. डिसेंबरच्या पंधरवड्यातही किमान तापमानाने थंडीची जाणीव करून दिली नाही. पहिल्या १५ दिवसांमध्ये एकच दिवस १८.५ अंश सेल्सिअसपर्यंत मुंबईचे तापमान उतरले आणि धुक्याचा अनुभव घेता आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा किमान तापमानाने उसळी घेतली होती.

मात्र आता मुंबईमध्ये तापमान उतरून किमान काही काळ गारठ्याचा अनुभव घेता येतो. या आठवड्यामध्ये हा अनुभव मुंबईकरांना घेता आला आहे. पारा घसरल्याने मुंबईत गारठा वाढला आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या १० वर्षांमध्ये १७ अंशांखालीही तापमान गेले आहे.

आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान १०.६ अंश सेल्सिअस होते. ही नोंद सन १९४९ मधील आहे. आता गुरुवारपेक्षा किमान तापमान खाली उतरणार का, यासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागेल.

Recent Posts

कर्करोगाला हरवून ४०० कोटी रुपयांची कंपनी सुरू करणारी कनिका

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे वयाच्या २३ व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मात्र तिने हिंमतीने…

4 mins ago

CSK vs RCB: प्लेऑफमध्ये बंगळुरु ‘रॉयल’ एंट्री, चेन्नईचा २७ धावांनी केला पराभव…

CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने…

16 mins ago

मराठीचा हक्क

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार…

19 mins ago

मुंबईवर वर्चस्व कोणाचे?

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या…

32 mins ago

IPL 2024: विराट कोहलीचा रेकॉर्ड, क्रिस गेलशी केली बरोबरी

मुंबई: विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरोधात आयपीएल सामन्यात रेकॉर्ड्सची बरसात केली आहे. विराट कोहलीचे अर्धशतक तीन…

3 hours ago

Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाची कारवाई, आतापर्यंत जप्त केले तब्बल ८८८९ कोटी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पाचव्या टप्प्याचे मतदान २० तारखेला होणार आहे. यातच…

4 hours ago