Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीसिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्या भूमाफिया विरुद्ध सिडकोची धडक कारवाई

सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्या भूमाफिया विरुद्ध सिडकोची धडक कारवाई

नवी मुंबई(प्रतिनिधी) – सिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमीनीवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांविरुध्द सिडकोने कारवाई करून,५ डंपरjजप्त केली व त्यावरील चालक यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर तसेच भूखंडावर डी ब्रिज माफियांकडून अनधिकृतपणे मोठया प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत आहे. सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक पर्यावरणास हानीकारक असल्याने टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस विभाग यांचे. सह १९ मार्च २०२४ रोजी रात्रौ सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना रात्रौ ९.३० ते १० वाजताचे सुमारास अपोलो हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या पेट्रोलपंपाच्या बाजूला, सीबीडी, नवी मुंबई येथे मानवी आरोग्यास हानीकारक असलेले डेब्रीजने भरलेले ५ डंपर आढळून आले.

सदर डंपर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तसेच उलवे नवी मुंबई परिसरात डेब्रिज खाली करण्यासाठी जाण्याचे प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्याने डंपर क्रमांक १) MH-४७-Y-९८३७ वरील चालक कमलेश जगदिश चौहाण, वय ३० वर्षे, रा. गणपती पाडा तुर्भे, एम. आय. डी. सी. नवी मुंबई, २)MH- ४३-BP-१९३३ वरील चालक मोहमंद मॅफुज, वय २५ वर्षे, रा. तुर्भे नाका, नवी मुंबई ३) MH-४६-BM- ३६०४ वरील चालक गौतम लक्ष्मण महतो, वय ३८ वर्षे, रा. साईनगर वहाळ, ता. पनवेल, जि. रायगड, ४) MH-०४-LE-३९६९ वरील चालक नाजिर खान, वय ३७ वर्षे, रा. कदमनगर गोवंडी रोड, पं. १४, शिवाजीनगर, ५) MH-०३-DV-६४०० वरील चालक विकास कुंडलीक कुटे, वय ३७ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, मुंबई मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले व तसेच वर नमुद पाचही डंपर ताब्यात घेऊन. डंपर वरील चालक यांच्या विरुध्द सी.बी.डी. बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४१/२०२४ भा.दं.वि.सं.क. २६९, ५११, ३४ प्रमाणे सीबीडी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे

सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे याव्दारे आवाहन सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी केले आहे .

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -