महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’वर आधारीत चित्ररथ

Share

मुंबई  :भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच अनुषंगाने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.

युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्लू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

तसेच दुर्मीळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.

असा आहे चित्ररथ

– दर्शनी बाजूस भव्य ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती
– दीड फूट दर्शविणारे राज्यफूल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ आणि त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा
– १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी
– कास पठाराची प्रतिमा
– दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा
– चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा

Tags: 26th jan

Recent Posts

Rohit Sharma: आयुष्यात आधीही ही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

50 mins ago

Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…

1 hour ago

Nitesh Rane : निवडणूक आयोगाला प्रश्न विचारुन संजय राऊतने अकलेचे तारे तोडू नयेत!

आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात…

3 hours ago

अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणार या ३ राशींचे चांगले दिवस, सोन्याप्रमाणे चमकणार नशीब

मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या…

3 hours ago

पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास प्रचंड शक्तिप्रदर्शनासह डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कल्याण…

3 hours ago

50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…

3 hours ago