Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीChitra Wagh Vs Sanjay raut : देवेंद्रजींच्या छत्रछायेतच चालते राऊतांची टिवटिव!

Chitra Wagh Vs Sanjay raut : देवेंद्रजींच्या छत्रछायेतच चालते राऊतांची टिवटिव!

सर्वज्ञानी संजय राऊतांना मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी दिसत नाही का?

श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊतांनी केलेल्या टीकेचा चित्रा वाघ यांनी घेतला समाचार

मुंबई : ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे शुभदिप हे निवासस्थान असलेल्या परिसरात सामान्यांना वाहतूकबंदी करण्यात आल्याचे पत्रक ठाणे पोलिसांनी (Thane Police) जारी केले होते. मात्र, अशी कोणतीही सूचना आम्ही दिली नसल्याचे व व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच नको असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी स्पष्ट करत ठाणे पोलिसांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावरुन टीका केली. मुख्यमंत्र्यांसाठी रस्ता बंद करणे जरा अतीच झाले, ही पोलीस खात्याची मिंधेगिरी आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या टीकेचा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चांगलाच समाचार घेतला. थेट मातोश्रीवर निशाणा साधत त्यांनी खरमरीत टीका केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वज्ञानी संजय राऊत, मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? ठाकरे राजपरिवाराच्या या मातोश्री नामक किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी किती पोलीस पहारे, किती नाका बंदी आणि किती अडथळे पार करावे लागतात, हेही जनतेला कळू द्या. सर्वसामान्यांसाठी मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो, हेही एकदा सांगाच, असं आवाहन त्यांनी केलं.

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात हिंसाचार आहे, बलात्कार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहे तिथे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर चोख प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्री देवेंद्रजी एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा, असा भेदभाव करत नाहीत, हे आपल्याच उदाहरणावरून कळले असेलच. तुमची महाज्ञानी टिवटिवही देवेंद्रजींच्याच सुरक्षाव्यवस्थेच्या छत्रछायेत चाललेली असते, याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी वसुली धंदे केले, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे पोलीस कुणाचे मिंधे नाही, हे लक्षात घ्या सर्वज्ञानी’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांची चांगलीच जिरवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -