चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर

Share

दिल्ली बिघडवणार सुपर किंग्जचे गणित?

  • वेळ : दुपारी ३.३० वा.
  • ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी गटातील लढतींनी चांगलाच रंग भरला असून प्ले ऑफ प्रवेशाची चुरसही वाढली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दिल्लीच्या संघाला त्यांच्याच घरात पराभूत करण्याचे आव्हान तुलनेने तगड्या चेन्नईसमोर आहे. करिष्माई कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली सुपर किंग्ज शनिवारी कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

यंदाच्या मोसमातील या दोन संघांमधील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला पराभवाची चव चाखली होती. त्याची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान चेन्नईच्या संघासमोर आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. चेन्नईने आजचा सामना जिंकला, तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ ठरेल. मात्र चेन्नईचा पराभव झाला, तर संघाला दुसऱ्या संघाच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावे लागेल.

दिल्ली कॅपिटल्स संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे; परंतु या हंगामाचा शेवट गोड करून चेन्नईचे समीकरण बिघडवण्यात दिल्ली कोणतीही कसर सोडणार नाही. चेन्नईचा संघ सध्या १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतरांच्या गणितावर अवलंबून राहावे लागेल. विजयामुळे चेन्नईचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होईल. परंतु ते दुसरे स्थान मिळवतील की नाही? हे लखनऊ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर ठरेल. लखनऊचेही १५ गुण आहेत. पण चेन्नईचा रनरेट चांगला आहे.

फिरोजशाह कोटलाची विकेट संथ असून धोनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. जडेजा, मोईन अली आणि महिश तिक्षणा यांनीही फिरकी विभागात चांगली छाप पाडली आहे. ऋतुराज, डेव्हन कॉनवेने यांनी मोसमात चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कल्याणचा सुपुत्र तुषार देशपांडेने या मोसमात संघासाठी सर्वाधिक १९ विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे पंजाब किंग्जवर १५ धावांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर दिल्लीचा संघ आत्मविश्वासासह या सामन्यात उतरेल. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ या सामन्यातही कोणत्याही दबावाशिवाय खेळेल आणि अशा स्थितीत चेन्नईला सावध राहावे लागेल. अक्षर पटेल वगळता दिल्लीच्या संघातील इतर भारतीय फलंदाज या हंगामात अपयशी ठरले. दिल्लीने आतापर्यंत जे जे सामने जिंकले आहेत, त्यात त्यांच्या गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी फिरकी विभाग चांगल्या प्रकारे हाताळला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियालाही आपली लय सापडली आहे. आता वार्नरसेना धोनीच्या विजयाच्या अपेक्षांना ब्रेक लावून चेन्नई एक्स्प्रेसचे प्ले ऑफ प्रवेशाचे स्वप्न धुळीस मिळवेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण मुंबईकरांचेही प्लेऑफचे भवितव्य यावर अवलंबून आहे.

Recent Posts

BAN vs NED: शाकिबच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने नेदरलँड्सला हरवले, सुपर८मधील आव्हान कायम

मुंबई: शाकिब अल हसनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्सला २५ धावांनी हरवले. बांगलादेशने नेदरलँड्सला…

30 mins ago

Friday: शुक्रवारच्या दिवशी करू नका ही कामे, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

मुंबई: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असतो. लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर काही…

1 hour ago

तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिड तर वाढत नाहीये ना? दुर्लक्ष करू नका…

मुंबई: चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलमुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढू लागतो. खाण्या-पिण्याच्या गोष्टीमधून अनेकदा…

2 hours ago

जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ

ओडिशा : ओडिशा येथे भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकामागून एक निर्णयांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळत…

3 hours ago

दहशतवाद्यांना पूर्ण क्षमतेने उत्तर द्या

पंतप्रधान मोदींचे सुरक्षा यंत्रणांना निर्देश नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी…

3 hours ago

Loksabha: लोकसभा सभापतीपदासाठी २६ जूनला होणार निवडणूक

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४(loksabha election 2024) संपल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. रविवारी…

4 hours ago