Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रहत्येचा मास्टरमाईंड इरफानच्या 'एनजीओ' चे कनेक्शन तपासणार

हत्येचा मास्टरमाईंड इरफानच्या ‘एनजीओ’ चे कनेक्शन तपासणार

अमरावती (हिं.स.) : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडाचा सूत्रधार शेख इरफान शेख रहीम याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इरफान चालवत असलेल्या रहबर हेल्पलाईन या एनजीओचे कनेक्शन तपासले जाणार आहे. याप्रकरणी अमरावती पोलिस आणि एनआयए समांतर तपास करीत आहेत.

प्रेषित मोहम्मद पैगंबरावर कथित आक्षेपार्ह टिप्पण करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावती येथील मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफानला २ जुलै रोजी नागपुरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. इरफानच्या आदेशानंतरच आरोपींनी उमेश कोल्हे यांची हत्या केली होती. आता रहमानची एनजीओ तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. तपास यंत्रणा इरफानच्या एनजीओला होणारे फंडिग, त्याचा अर्थिक व्यवहार आणि कुणाकुणाशी लागेबांधे होते याचा शोध घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -