Friday, May 17, 2024
HomeदेशChandrayaan-3: 'चांद्रयान ३'च्या रोव्हरने केला ८ मीटरचा प्रवास, इस्त्रोने दिली माहिती

Chandrayaan-3: ‘चांद्रयान ३’च्या रोव्हरने केला ८ मीटरचा प्रवास, इस्त्रोने दिली माहिती

नवी दिल्ली : Chandrayaan-3 चा रोव्हर (rover) म्हणजेच प्रज्ञान लँडरमधून बाहेर आल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर साधारण ८ मीटर चालला आहे. ही खुशखबर इस्त्रोने (isro) ट्वीट करून दिली आहे. रोव्हर, लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल व्यवस्थित आहेत. सर्व पेलोड्स म्हणजेच आतमध्ये असलेली सर्व यंत्रे सुरळीत काम करत आहेत.

आधी हे जाणून घेऊया की प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर व्यवस्थित काम करत आहे. रोव्हरमध्ये दोन पेलोड्स लावले आहेत. पहिला आहे लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. हा एलिमेंट कंपोझिशनचा अभ्यास करेल. जसे मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त आणि लोह. याचा शोध लँडिंग साईटच्या जवळपास चंद्राच्या पृष्ठभागावर केली जाईल.

दुसरा पेलोड आहे अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील केमिकल्स म्हणजेच रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. सोबतच खनिजांचाही शोध घेणार आहे. आज म्हणजेच २५ ऑगस्ट २०२३च्या सकाळी लँढरमधून बाहेर येताच रोव्हरचा व्हिडिओ इस्त्रोने जारी केला होता.

कसा आहे रोव्हरचा आकार?

चांद्रयान ३च्या रोव्हरचे एकूण वजन २६ किलोग्रॅम इतके आहे. हा तीन फूट लांब, २.५ फीट रूंद आणि २.८ फूट उंच आहे. हा सहा पायांवर चालतो. कमीत कमी ५०० मीटर म्हणजेच १६०० फूटापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर काम करू शकतो. याचा स्पीड १ सेंटीमीटर प्रति सेकंद आहे. हा पुढील १३ दिवसांपर्यंत जोपर्यंत सूर्याकडून प्रकाश मिळत राहील तोपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर काम करत राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -