Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीChanadrayaan 3: यशस्वी चांद्र मोहीम आणि मोदींनी यांना केला पहिला फोन...

Chanadrayaan 3: यशस्वी चांद्र मोहीम आणि मोदींनी यांना केला पहिला फोन…

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान ३’ (chandrayaan 3) ने यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण देशात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोची (isro) टीम आणि सर्व देशवासियांचे दक्षिण आ्फ्रिकेतून अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेचच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना फोन करून लगेच अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्याशी मोबाईलवर बातचीतदरम्यान म्हणाले, सोमनाथजी तुमचे नाव सोमनाथ आहे आणि सोमनाथ नाव चंद्राशी जोडलेले आहे. यासाठी तुमचे कुटुंबीय नक्कीच आनंदित असतील. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन. सगळ्यांचे माझ्याकडून अभिनंदन.शक्य होईल तितके लवकरच मी तुम्हाला भेटून अभिनंदन करेन. खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार.

 

याआधी चांद्रयान ३च्या लँडिंगनंतर लगेचच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असा इतिहास बनताना पाहिले तर जीवन धन्य होऊन जाते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रीय जीवनात चिरंजीवी राहतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार कण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्र पथावर चालण्याचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -