Categories: पालघर

Boisar Fire : बोईसरमध्ये अंग्नितांडव; आगीत १५ भंगाराची गोदामे भस्मसात, तर एक पिकअप जळून खाक

Share

बोईसर : बोईसर येथील अवध नगर भागातील भंगार गोडाऊनला रात्री दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या अग्नितांडवात (Boisar Fire) भंगाराची १५ गोडाऊन जळून खाक झाली. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाच्या वादळी वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप घेतले. आगीशी झुंज देत पहाटे साडे सहा वाजताच्या सुमारास तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांना सहा गाड्यांसह आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे, चाळी, बेकायदेशीर गोदामे याकरिता अवध नगर परिसर ओळखले जाते. याठिकाणी सुमारे दोन ते तीन एकरमध्ये दाटीवाटीने उभारण्यात आलेली ही भंगार गोडाऊन असून, या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी एक पिकअप गाडी जळून खाक झाली आहे़ तर दोन छोटे टेम्पो व लागून असलेली वीस ते पंचवीस गोडाऊन वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

हे अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, पालघर नगरपरिषद १, तारापूर अणुऊर्जा केंद्र १, वसई-विरार महानगरपालिका १ व डहाणूच्या अदानी पॉवर स्टेशनची १ गाडी अशा एकूण सहा अग्निशमन गाड्यांवरील जवान शर्तीचे प्रयत्न करीत होते.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रचंड अडचणी येत होत्या, पाच तासांच्या अथक प्रयत्नाअंती अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी सकाळी १० वाजता पुन्हा आगीने थोडे डोके वर काढले होते.त्या वेळी पुन्हा लागलीच आग विझविण्यात आली. सदर आग विझविण्यासाठी सुमारे दीड ते दोन लाख लिटर पाणी लागले असुन सुदैवाने ती आग लोकवस्तीपर्यंत पोहोली नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी मात्र दाटीवाटीने उभारण्यात आलेल्या या भंगार गोदामांवर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान लागलेल्या आगीचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक १ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ चंद्र राशी…

1 hour ago

महाराष्ट्र आणि मराठी माणूस समृद्ध आणि संपन्न होवो

महाराष्ट्राच्या निर्मितीला आज ६४ वर्षे पूर्ण झाली. दि. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची…

4 hours ago

आपल्यासोबत कोणी माफिया गेम तर खेळत नाही ना?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे सन १९८७ मध्ये Dmitry Davidoff नावाच्या मानस शास्त्रज्ञाने माफिया गेम हा…

5 hours ago

कोकणवासीयांचे दादा…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण…

6 hours ago

MI vs LSG: स्टॉयनिसच्या खेळीने लखनौ विजयी, रोहितच्या वाढदिवशी हारली मुंबई…

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक…

6 hours ago

राज्यातील पाणीसंकट अधिकच गडद

राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या सूचना…

7 hours ago