Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीBMC Khichdi Scam : संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचे...

BMC Khichdi Scam : संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचे समन्स

खिचडी घोटाळा चांगलाच भोवणार

मुंबई : कोविड काळात महाविकास आघाडीने सर्वसामान्यांचा फायदा घेऊन केलेल्या घोटाळ्यांचा (BMC Covid Scam) लवकरच पर्दाफाश होणार आहे. त्यासाठी ईडी (ED) व आर्थिक गुन्हे शाखेचीही वेगाने कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय व ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांचीही सर्व मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यातच आता संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत (Sandeep Raut) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे कुटुंबियही या प्रकरणात चांगलेच अडकणार आहेत.

संदीप राऊत यांना कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात (Khichdi Scam) ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना ३० जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी त्यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडूनही चौकशी झाली होती. खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांनाही मिळाले असल्याचा आरोप आहे.

खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटींचा हा कोविड घोटाळा आहे. गरीब स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.

आतापर्यंत कोणावर गुन्हा दाखल?

मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -