Monday, June 17, 2024
Homeदेशगुजरात निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक ठरले!

गुजरात निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक ठरले!

गडकरी-फडणवीस यांचा समावेश

अहमदाबाद : गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे.

या यादीत गुजरात भाजपचे प्रमुख सी. आर. पाटील, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि स्मृती इराणी यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नावांचाही समावेश आहे. दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.

भोजपुरी गायक आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांना स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -