Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीBJP Protest : सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं काँग्रेसविरोधात आंदोलन

BJP Protest : सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं काँग्रेसविरोधात आंदोलन

मात्र निशाण्यावर उद्धव ठाकरे…

नागपूर : नागपूरच्या विधानभवन (Nagpur Vidhanbhavan) परिसरात सत्ताधारी भाजपच्या (BJP Government) आमदारांनी आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेसविरोधात (Congress) आंदोलन केलं. काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस काँग्रेसविरोधात आंदोलन असलं तरी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य करण्यात आलं होतं.

स्वातंत्र्यावीरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असं म्हणत भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. ‘सावरकर का यह अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान’, ‘खरगे हाय हाय’, ‘सोनिया जिनकी मम्मी है, वह काँग्रेस डमी है’ अशा घोषणा देण्यात आल्या. याचसोबत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधण्यात आला. ‘उद्धव ठाकरे जवाब दो’ असे बॅनर्स हातात घेऊन भाजपचे आमदार त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते.

अनेकदा विरोधकच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन करत असतात. पण यावेळेस सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या विरोधात आंदोलन केले. शिवाय सावरकरांबाबतच्या या मुद्द्यावरुन राज्यभरात इतर ठिकाणीही भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेची आंदोलने सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली बाजू श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी झटत आहे. त्या शर्यतीत भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या काँग्रेसविरोधात आंदोलन करुन भाजपने आपला निषेध नोंदवला. त्याचसोबत इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची मान खाली घालणाऱ्या उबाठालासुद्धा भाजपकडून काँग्रेस नेत्याच्या कृत्याबाबत जबाब विचारण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -