Saturday, May 18, 2024
HomeदेशBJP: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी

BJP: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी(assembly election) विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपही (bjp) पाच राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीच कसर सोडणार नाही आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्ष अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्यासह सीईसी उपस्थित होते. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंहही बैठकीत सामील होते.

आधीपासूनच तयार आहे भाजप

भाजपची केंद्रीय निवडणूक समिती ही निवडणुकीची रणनीती आणि निर्णय घेणारी पक्षाची सर्वात मोठी कमिटी आहे. साधारणपणे ही समितीची बैठक निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होते मात्र यावेळी भाजप सुरूवातीपासूनच जोरदार तयारी करत आहे. कारण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे त्यामुळे पक्ष यावेळेस तयारीमध्ये कोणतीच कमतरता सोडणार नाही.

INDIA विरुद्ध NDAची लढाई

कर्नाटकमध्ये भाजपला मात दिल्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मजबूत दिसली आणि विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये त्यांचे महत्त्व वाढले. यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. ही आघाडी २०२४च्या निवडणुकीत भाजपला टक्कर देईल.

या पाच राज्यांत या वर्षी होणार निवडणूक

या वर्षी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. असे मानले जात आहे की छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांच्याव्यतिरिक्त इतर राज्यांच्या निवडणूक मुद्द्यावर भाजपची समिती इतर बैठका घेऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -