Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीNilesh Rane : भाजप खासदार निलेश राणे यांना इन्फ्लूएंझाची लागण

Nilesh Rane : भाजप खासदार निलेश राणे यांना इन्फ्लूएंझाची लागण

सर्वांना काळजी घेण्याचे केले आवाहन

मुंबई : हल्ली खराब वातावरणामुळे साथीच्या आजारांची (Epidemic disease) लाट आली आहे. पाऊस कधी पडतो तर कधी पडतच नाही, याचादेखील हवामानावर परिणाम होत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार बळावले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र आणि भाजप खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनादेखील याच हवामानबदलाचा त्रास झाला आहे. निलेश राणे यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या एक्स (X) अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. सोबतच सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भाजप खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “१० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये इन्फ्लूएंझा व्हायरस (Influenza virus) डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही”.

सध्याच्या पावसाळ्याच्या आणि खराब वातावरणाच्या दिवसांत आपणच आपली काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे संक्रमणापासून वाचण्यासाठी अगदी साध्या साध्या पण गरजेच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे आणि गेल्यास मास्क वापरणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे आणि लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे, अशी सावधगिरी बाळगल्यास आजारांची लागण होण्याची शक्यता कमी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -