Saturday, May 18, 2024
HomeदेशBJPने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट, त्रिपुराची महाराणी आणि मैसूरचे राजा पहिल्यांदा...

BJPने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट, त्रिपुराची महाराणी आणि मैसूरचे राजा पहिल्यांदा लढवणार निवडणूक

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या यादीत दोन राजघराण्यातील वंशजांच्या नावांचा समावेश आहे. ७२ उमेदवारांच्या या लिस्टमध्ये त्रिपुराची महाराणी कृती सिंह देववर्मा आणि मैसूर शाही कुटुंबाचे प्रमुख यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने कृती सिंह देववर्मा यांना त्रिपुरा पूर्व येथून मैदानात उतरवले आहे तर वाडियार राजवंशाचे राजा मैसूर येथून निवडणूक लढवतील.

भाजपने आतापर्यंतच्या दोन्ही यादी मिळून एकूण २६७ नावांची घोषणा केली आहे. दरम्यान, यातील २ उमेदवारांनी आपले नाव मागे घेतले आहे. आतापर्यंत पक्षाने दोन्ही उमेदवारांच्या जागी दुसऱ्या कोणाचीही घोषणा केलेली नाही. भाजपने उमेदवारांची जी दुसरी यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून प्रत्येकी २०, हरयाण आणि तेलंगणा येथून प्रत्येकी ६, मध्य प्रदेशमधील ५, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथून प्रत्येकी २, त्रिपुरा, दादरा नगर हवेली येथून प्रत्येकी १ उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

कोण आहेत महाराणी कृती सिंह

महाराणी कृती सिंह देववर्मा टिपरा मोथा पक्षाचे संस्थापक आणि त्रिपुरा शाही कुटुंबाचे प्रमुख मणिक्य देववर्मा यांच्या मोठ्या बहीण आहेत. तया आगामी लोकसभा निव़णुकीत पहिल्यांदा मैदानात उतरत आहे. दरम्यान, त्यांचे आई-वडिल राजकारणात सक्रिय होते आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. त्यांचे वडील किरीट विक्रम देववर्मा तीन वेळा खासदार होते. तसेच त्यांची आई कुमारी देवी दोन वेळा काँग्रेसच्या आमदार होते.

मैसूरचे शाही २७वे राजे यदुवीर

भाजपच्या दुसऱ्या यादीत सामील असलेले दुसरे नाव मैूसरचे शाही कुटुंबातील यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार आहेत. ३२ वर्षीय यदुवीर जयरामचंद्र वाडियार यांचे नातू आहेत. जयरामचंद्र वाडियार मैसूरचे २५वे आणि शेवटचे राजा होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -