Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीBiparjoy Cycolne Update: बिपरजॉयचा राजस्थानात हाहाकार, वादळामुळे महाराष्ट्रावरही 'हे' भीषण संकट

Biparjoy Cycolne Update: बिपरजॉयचा राजस्थानात हाहाकार, वादळामुळे महाराष्ट्रावरही ‘हे’ भीषण संकट

कच्छ: गुजरातला दिलेल्या तडाख्यानंतर बिपरजाॅय (Biparjoy Cyclone) शुक्रवारी रात्री राजस्थानात (Rajsthan) धडकले. परंतु त्याचा वेग मंदावला असून ताे ताशी ५० ते ६० किलाेमीटर असा झाला आहे. तरीही बाडमेर, सिराेही, उदयपूर, जालाैर, जाेधपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

वादळानंतर गुजरात, राजस्थानसाेबतच आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत पावसाला सुरुवात हाेईल. गुजरातमध्ये शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. कच्छ, पाटन, बनासकांठा, मेहसाणामध्ये आजदेखील अतिवृष्टीची शक्यता आहे. साेमवारनंतर वादळ क्षीण पडेल. त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मध्य प्रदेश, ग्वाल्हेर-चंबल आणि जवळील उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. या वादळामुळे मान्सूनचे आगमन राज्याच्या वेशीवरच थांबले आणि लांबणीवर पडत चालले आहे. १० जुलैपर्यंत पाऊस कमीच राहणार असल्याचा अंदाज आहे. मान्सून हंगाम सुरू होऊन उलटलेल्या १६ दिवसांत राज्यातील सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत फक्त १३ टक्केच पाऊस पडला आहे. पुढेही सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असून मोठ्या खंडाचे प्रमाण राहण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. राज्यात १५० लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन पूर्ण झाले आहे.

हेही वाचा…..

Biparjoy Update: बिपरजॉयचा वेग कमी पण…

Biparjoy cyclone: हाहाकार! बिपरजॉय धडकले

 

मान्सून अपडेट : बंगाल, बिहारमध्ये ढगांची गर्दी

ईशान्येतील राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. परंतु सोमवारच्या आधी तरी पूर्व भारत किंवा दक्षिणेकडील भागातही मान्सून पुढे जाण्याची शक्यता कमी आहे.

मान्सून ११-१२ जून राेजी महाराष्ट्रातील रत्नागिरी, कर्नाटकातील काेप्पल, आंध्र प्रदेशातील श्रीहरीकाेटा, पश्चिम बंगालच्या मालदा व बिहारच्या फारबिसगंजमध्ये दाखल झाला हाेता. पण दाेन-तीन दिवस त्याचा तेथे मुक्काम असू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -