Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजThackeray group : ठाकरे गटाला मोठा धक्का! आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय सूरज चव्हाण...

Thackeray group : ठाकरे गटाला मोठा धक्का! आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय सूरज चव्हाण अटकेत

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना कोविड काळात (Covid Pandemic) केलेल्या घोटाळ्यामुळे ठाकरे गट (Thackeray group) चांगलाच अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना खिचडी वितरणात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांना समन्स बजावलं होतं. २५ नोव्हेंबर रोजी दोघांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतरही याप्रकरणी चौकशा आणि तपास चालू होता. दरम्यान, ईडीने काल १७ जानेवारी रोजी रात्री सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. ही अटक म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.

अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण दोघेही ठाकरे गटात आहेत. खिचडी वितरणात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी १ सप्टेंबर २०२३ रोजी फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, सुजीत पाटकर, फोर्सव मल्टी सर्व्हिसेसचे भागिदार आणि कर्मचारी, स्नेहा केटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी आणि संबंधित खासगी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी ६.३६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -