Wednesday, April 23, 2025
Homeदेशpaytmवर रिझर्व्ह बँकेकडून मोठी कारवाई

paytmवर रिझर्व्ह बँकेकडून मोठी कारवाई

नवी दिल्ली: ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला(paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून(indian reserve bank) मोठा झटका बसला आहे. खरंतर, बुधवारी डिजीटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिस देणारी कंपनी पेटीएमच्या बँकिंग शाखा पेटीएम पेमेंट बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच PPBLमध्ये आता कोणतेही नवे ग्राहक जोडले जाणार नाहीय. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी हे आदेश दिले.

डिपॉझिट टॉपअप स्वीकारले जाणार नाहीत

पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिलेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ यानंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.

बँकेच्या ग्राहकांकडून सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, प्रीपेड इस्ट्रुमेंटेस, फास्टॅटॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसह आपल्या खात्यात राहिलेली रक्कम अथवा त्याचा उपयोगाची परवानगी कोणत्याही बंदीशिवाय दिली जाणार आहे.आरबीआयने पेटीएम पेमेंट्स  बँकविरुद्ध ही कारवाई बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत केली आहे.

पेटीएमच्या शेअर्सवर दिसू शकतो परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा परिणाम गुरूवारी पेटीएमच्या शेअर्सवर दिसू शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -