शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी सोसायटीमध्ये अग्रेसर असणारी आणि राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर ३० जानेवारी रोजी ८० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने १७ जागेसाठी आता ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
यावर्षी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या लढतीत दोन अपक्षांसह हनुमान जनसेवा पॅनल, जनसेवा पॅनल व परिवर्तन पॅनल असे तीन पॅनल मध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. या निवडणुकीत मतदार राजा कोणत्या उमेदवारांना विजयाचा कौल देतो व कोणत्या पॅनलला बहुमत देतो याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे.
पंचक्रोशीतील संस्थानच्या कर्मचाऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या या सोसायटीच्या निवडणुकीसाठी १६६६ मतदार संख्या आहे. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांनी हनुमान पॅनल उभा केला असून यामध्ये बापूसाहेब कोते, डॉ प्रितम वडगावे, राजेंद्र बोठे, रायभान डांगे, मिनीनाथ कोते, देवानंद शेजवळ, संदीप जगताप, नामदेव सरोदे, भाऊसाहेब दिघे, प्रमोद गायके, वसंत चौधरी, सुनील लोंढे, ज्ञानदेव शिंदे, पांडुरंग धुमसे, रमेश शेलार, प्रतिभा बनसोडे आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यांची निशाणी कपबशी आहे.सत्ताधारी गटाकडून प्रतापराव कोते यांनी जनसेवा पॅनल उभा केला असून यामध्ये प्रतापराव कोते,यादवराव कोते, अरुण जाधव, सुनील डांगे, रवींद्र चौधरी, बाळासाहेब थोरात, प्रल्हाद कर्डिले, बाळासाहेब पाचोरे, बापूसाहेब गायके,डॉ संदीप शेळके, डॉ महिंद्र तांबे,मनोज साबळे, विजय हिरे, जयराम कांदळकर, राजेंद्र भालेराव, वैशाली सुर्वे, मीना वाळे आदी उमेदवार असून यांची निशाणी शिट्टी आहे.विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी परिवर्तन पॅनल उभा केला असून यामध्ये पोपटराव कोते, भाऊसाहेब कोकाटे, रवींद्र गायकवाड, मिलिंद दुबळे, संभाजी तुरकणे, इकबाल तांबोळी, विनोद कोते ,तुळशीराम पवार, देविदास जगताप, कृष्णा आरणे ,भाऊसाहेब लवांडे, महादेव कांदळकर, विठ्ठल पवार, संभाजी गागरे, गणेश आहेर, सुनंदा जगताप, लता बारसे आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यांची निशाणी छत्री आहे.असे एकूण तीन पॅनलमध्ये प्रत्येकी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. सत्ताधारी गटातील माजी चेअरमन तुषार शेळके आणी श्रद्धा कोते यांनी अर्ज माघारी घेतले आहे.