Categories: Uncategorized

‘शेअर बाजार उच्चांकाला सावधानता बाळगा’

Share

शेअर बाजारात या आठवड्यात देखील तेजी पाहावयास मिळाली. आपण मागील लेखात निर्देशांक १८७०० या पातळीपर्यंत जाऊ शकतो हे सांगितलेले होते. आपण सांगितलेला टप्पा निफ्टीने या आठवड्यात गाठलेला आहे. पुढील आठवड्याचा विचार करता १८३०० ही निफ्टीची अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी अशीच कायम राहील. निफ्टीची तेजी अशीच टिकून राहिली, तर निफ्टी १९००० या पातळीपर्यंत वाढ दाखवू शकते. निफ्टीमध्ये मध्यम मुदतीच्या आलेखानुसार तेजीचा हेड अँड शोल्डर यापूर्वीच तयार झालेला आहे. पुढील काळात निफ्टीने १८६०५ ही पातळी बंदभाव तत्त्वावर तोडली, तर निर्देशांक निफ्टीमध्ये जवळपास १२०० ते १५०० अंकांची आणखी वाढ होईल हे सांगितलेले आहे. या आठवड्यात निफ्टीने ही पातळी तोडत मोठ्या वाढीचे संकेत दिलेले आहेत. सध्या निर्देशांकात मध्यम मुदतीच्या चार्टसोबत अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकात तेजीचा “कप अँड हँडल” ही रचना तयार झालेली आहे. या रचनेनुसार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अल्पमुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र फंडामेंटल बाबींकडे पाहता निर्देशांक उच्चांकाला आलेले आहेत. त्यामुळे सावधानता आवश्यक आहे. मात्र दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते. अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाहीत.

परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे ही मोठी चूक ठरू शकते. याला कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात, त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना टेक्निकल आणि फंडामेंटल अशा दोन्ही बाबींचा आपल्याला विचार करणे आवश्यक असते. शेअर बाजारामध्ये निर्देशांकांची असणारी मुख्य दिशा आणि त्यानंतर त्या मुख्य दिशेच्या विपरीत असणारी दिशा अर्थात करेक्शन या दोन्ही गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करावी लागते. शेअर बाजाराची मुख्य दिशा तेजीची असेल, तर येणारे करेक्शन ही खरेदीची संधी असते.

याउलट शेअर बाजाराची मुख्य दिशा मंदीची असेल तर येणारे करेक्शन अर्थात बाऊन्स ही शेअर्स विक्रीची संधी असते. सध्या शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे. मात्र टेक्निकल आणि फंडामेंटलबाबतीत निर्देशांक हे उच्चांकाला असल्याने शेअर्स खरेदी करण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापुढे काही काळ कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस लावून केवळ अल्पमुदतीच्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी. अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. रेमंड, इंडिअन बँक, यूपीएल, ब्रिटानिया या कंपन्यांचे शेअर्स तेजीचा कल दाखवीत आहेत. मागील आठवड्यात “जेके टायर” या शेअरने १६२ ही पातळी तोडत मध्यम मुदतीसाठी तेजीची रचना तयार केलेली आहे. या रचनेनुसार या शेअरमध्ये पुढील काळात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आज २०२ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये बंदभाव तत्त्वावर १६८ रुपये किमतीचा स्टॉपलॉस ठेवून तेजीचा व्यवहार करता येईल. कच्चे तेल अल्पमुदतीच्या चार्टनुसार तेजीत आलेले असून कच्चे तेल ६०५० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्चे तेलात वाढ होऊ शकते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

शेअर बाजारात गेले काही महिने नीच्चांकापासून मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे. – डॉ. सर्वेश सोमण, शेअर बाजाराचे तांत्रिक विश्लेषक

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

6 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

10 hours ago