
मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने चाकरमान्यांनी कोकणची वाट धरली आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे हाऊस फुल्ल झाली आहे. कोकणातील सर्वच रेल्वे स्थानके आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेक मुंबईकरांचे हाल होत आहेत.

मुंबई (प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या आरे वसाहतीत सध्या ५४ बिबट्यांचे अस्तित्व असून त्यात ४ पिल्लांचाही समावेश ...
येत्या १७ मेपर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मागील वर्षीच्या मानाने कोंकण रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या कमी असल्याने चाकरमान्यांना आता एसटी आणि खाजगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच काही चाकरमानी स्वत:च्या खासगी वाहनाने कोकण गाठल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.