Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Amravati : मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची टोळी ताब्यात

Amravati : मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची टोळी ताब्यात

अमरावती : रात्रीच्या वेळेस रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी फिरणाऱ्या लोकांच्या मागून भरधाव वेगाने बाईकने येऊन त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या आठ जणांच्या अल्पवयीनांच्या गॅंगचा राजापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्या आठ विधीसंघर्षित बालकांकडून ७१ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल व गुन्हयात वापरलेल्या २.८० लाख रुपये किमतीची एक बाईक व तीन मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वातील डीबी स्कॉडने २३ जानेवारी रोजी ही मेगा कारवाई केली.

राजापेठ पोलिस ठाण्यात यंदा नोंद असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या दोन घटनांचा तपास करत असताना महेंद कॉलनी येथील चार, शाम नगर येथील तीन व भातकुली पंचायत समिती परिसरात राहणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकांनी राजापेठ व चार, फेजरपुरा पोलिस ठाण्यााच्या हद्दीतून पत्येकी चार व गाडगेनगर हद्दीतून दोन असे दहा मोबाईल फोन जबरीने चोरी केल्याबाबतची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तुर्तास त्यांच्याकडून सात मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्या तरी तपासादरम्यान मोबाईल स्नॅचिंगचे आणखी काही गुन्हे उलगडण्याची शक्यता असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. चैनीसाठी ती अल्पवयीनांची टोळी मोबाईल हिसकावत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

Comments
Add Comment