Wednesday, May 7, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'महाराष्ट्राला एनर्जी ड्रिंक्सच्या विळख्यातून वाचवा'

'महाराष्ट्राला एनर्जी ड्रिंक्सच्या विळख्यातून वाचवा' मुंबई : महाराष्ट्र शासनाने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरू असूनही किराणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक हे एखाद्या ड्रग एवढेच घातक आहे. त्यामुळे शाळा कॉलेजच्या आसपास कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे.
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये असे लिहिण्यात आलेले असते. मात्र विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट या वयातील मुलांनाही एनर्जी ड्रिंक्सची विक्री करतात.
एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम
  1. एनर्जी ड्रिंक्समधील कॅफेन शरीराला घातक
  2. कॅफेनचे जास्त सेवन केल्यामुळे नशा येऊन मेंदू, किडणी, मज्जारज्जू यावर विपरीत परिणाम होतो.
  3. अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा या व्याधींचा धोका निर्माण होतो.
 
Comments
Add Comment