
नाशिक : पतंग उडवताना तोल गेल्याने ८ वर्षीय चिमुकल्याचा गच्चीरून कोसळून जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या गणेशनगरमध्ये काठी येथे घडली आहे. नक्ष संदीप बनकर असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीत शिकत होता. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पालघर : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पालघर वैतरणा मार्गावरील रेल्वे रुळाच्या बिघाडामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे ...
नवीन वर्षातील पहिल्या महिन्यातला पहिलावहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत म्हटलं तीळगूळ, तिळाचे लाडू, आणि पतंग उडवण्याची चढाओढ हे सगळं सादरसंगीत होतच मात्र अनेकदा आवाहन करूनही पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरला जातो. यावर्षी याच नायलॉन मांजाने अनेकांची घर उध्वस्त केली आहेत. अशातच आता नाशिकच्या गणेशनगरमध्ये काठी येथे नक्ष संदीप बनकर ( वय ८ ) गच्चीवर बेभान होऊन पतंग उडवत असताना तोल गेल्याने गच्चीवरून कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. ही काल (दि २०) दुपारच्या सुमारास घडली असून नक्षच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.