
मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सरप्राईस पहिल्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. तिच्यात मुळातच असलेला रांगडेपणा प्रेक्षकांना "तुज माज सपान " मालिकेतून भावला होता. तोच अभिनय आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यविरांसोबत रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी भासेहच ठसका आता हास्यजत्रेचा मंचावर पाहायला मिळेल.
View this post on Instagram

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी(swapnil Joshi). स्वप्नीलने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर करत ...
या प्रहसनामध्ये प्राजक्ता सोबत तिच्यासारखाच रांगडा गडी रोहित माने देखील असणार आहे. वनिता खरात, चेतना भट, नम्रता संभेराव देखील या प्रहसनात प्राजक्ता सोबत आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रशासनात काय होणार हि धमाल आपल्याला तेव्हाच समजेल पण एवढं नक्की आहे कि हे धमाल प्रहसन असणार आहे कारण या प्रहसना दरम्यान प्राजक्ता ने चक्क रोहित ला आपल्या खांद्यावर उचलून घेतला आहे. आपल्या रांगडेपणाचा आणि ताकदीची झलक प्राजक्ता ने या प्रहसणादरम्यान प्रेक्षकांना दाखविली आहे.