Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीअभिनेता स्वप्नील जोशीने खरेदी केली नवी कोरी कार, शेअर केला फोटो

अभिनेता स्वप्नील जोशीने खरेदी केली नवी कोरी कार, शेअर केला फोटो

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी(swapnil Joshi). स्वप्नीलने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. स्वप्नीलने नुकतीच नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. त्याने हि आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

स्वप्नीलचा सोशल मीडियावरही भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. दरम्यान, यंदाचं २०२४ हे वर्ष स्वप्नीलसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आहे. स्वप्नीलचं निर्मिती विश्वात पदार्पण आणि सुपरहिट चित्रपट दोन्हीही याच वर्षात घडून आलं. अशातच आता स्वप्नीलने नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर गाडी खरेदी केली आहे. त्यानं आपल्या कुटुंबीयांसह या नवीन गाडीचं स्वागत केलं आहे. कार घेतानाचा छानसा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना स्वप्नीलने लिहलं आहे कि, “हे सगळं माझ्या कुटुंबीयाच्या साथीने शक्य झालं. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आई-बाबांनी मला आत्मविश्वास दिला.ही डिफेंडर फक्त कार नाहीये. हे मी आजवर केलेल्या कामाचं प्रतीक आहे. माझ्या आई-बाबांच्या मेहनतीचं फळ आहे. आयुष्यात काहीच कठीण नाही. तुम्ही फक्त प्रयत्न केले पाहिजेत हे ही गाडी कायम दर्शवेल. तुमचं पॅशन, इच्छाशक्ती आणि प्रियजनांच्या साथीने तुम्ही कोणतीही गोष्टी ‘डिफेंड’र करू शकता. डिअर जिंदगी, ही फक्त एक सुरुवात आहे. या प्रवासात आणखी अनेक चढउतार पाहायचे आहेत. आयुष्यात आणखी खूप गोष्टी करायच्या आहेत. आता येणारा प्रत्येक दिवस मला काही ना काही नवीन शिकवून माझ्या एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. This is our moment to shine Congratulations dear Zindagi !!!!!

स्वप्नील जोशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, आता लवकरच स्वप्नील ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -