
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा धाकड फलंदाज शिखर धवनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धवनचा पत्नी आयेशासोबत घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊसस्थित कौंटुबिक न्यायालयाने शिखर धवनच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. सोबतच कोर्टाने मानले की शिखर धवनच्या पत्नीने शिखरला आपल्या एकुलत्या एका मुलापासून अनेक वर्षे वेगळे राहण्याचा त्रास दिला.
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाआधीश हरीश कुमार यांनी घटस्फोट याचिकेत धवनने आपल्या पत्नीविरोधात केलेले सर्व आरोप मान्य केले. आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की धवनच्या पत्नीने या आरोपांना विरोध केला नाही किंवा स्वत:चा बचाव करण्यात अयशस्वी ठरली.
मुलावर स्थायी कस्टडीचा आदेश नाही
धवनने आपल्या घटस्फोट याचिकेत म्हटले होते की त्याच्या पत्नीने त्याचा मानसिक छळ केला होता. न्यायालयाने धवन दाम्पत्यावर त्याच्या मुलावर स्थायी अधिकार म्हणजेच कस्टडीवर कोणतेही आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने धवनला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही कालावधीसाठी आपल्या मुलाला भेटण्यासाठी तसेच त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याचा अधिकारही दिला आहे.
न्यायालयाने धवनच्या पत्नीला शैक्षणिक कॅलेंडरदरम्यान शाळेच्या सुट्टीमधील कमीत कमी अर्धी सुट्टी धवन आणि त्याच्या कुटुंबियांसोबत त्याच्या मुलाला राहता यावे यासाठी भारतात येण्याचे आदेश दिले.
३७ वर्षीय शिखर धवनला वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्यासाठी क्रिकेटमधील हा सर्वात कठीण क्षण आहे. तो संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय.