
वाडा :वाडा (wada) तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायत मधील भोकर पाडा येथील नदीला पुल नसल्यामुळे नागरीकांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी स्थानिक आदिवासी बांधव अनेक समस्यांना तोंड देत जगत आहे.
?si=xkREPkhx8qCsYykC
भोकरपाडा येथील मनसेचे गारगाव उपाध्यक्ष जयराम घाटाळ व महाराष्ट्र सैनिक रामू बुधर, महेश बुधर यांनी शासनाने या गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील पावसाळ्याआधी पूल बांधुन देण्याची मागणी केली आहे. या जीवघेण्या नदीतील प्रवासापासून दिलासा द्यावा यासाठी मनसे वाडा तालुका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत मनसेचे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांनी सांगितले.