
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना - भाजप सरकारने बुधवारी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. सरकारने उद्धव, आदित्य व तेजस यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही कमी केल्यात. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजप सरकारच्या निर्णयानुसार, यापुढे उद्धव ठाकरे यांना झेड ऐवजी वाय दर्जाची सुरक्षा मिळेल. सरकारने मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत कपात केली आहे. तसेच ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी व पायल व्हॅनही कमी केली आहे.राज्याचे गृह खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.