Monday, May 5, 2025

क्रीडा

भारत-श्रीलंका आमनेसामने

भारत-श्रीलंका आमनेसामने

कोलंबो (वृत्तसंस्था) : भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात टी२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. उभय संघांत उद्या गुरुवारपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारतीय महिला संघ वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच मालिका खेळणार आहे. यासाठी खास श्रीलंका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी सलामीचा टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर २५ व २७ जून रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होणार आहे. रनगिरी दाम्बुला इंटरनॅशनल स्टेडियमवर टी-२० मालिकेतील सामने आयोजित करण्यात आले आहेत.

त्यानंतर हे दोन्ही संघ १ जुलैला सलामीच्या एकदिवसीय सामन्यात समोरासमोर असतील. तसेच ४ जुलैला दुसरा आणि ७ जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हे सामने पल्लेकल येथे होणार आहेत.

हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मन्धाना, यस्तीका भाटीया, सभीनेनी मेघना, जेमीमाह रॉड्रीक्स, दीप्ती शर्मा अशा तगड्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान यजमानांसमोर आहे. तर चमारी अट्टापट्टू, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, विश्मी गुणरत्ने यांच्यावर श्रीलंकेच्या संघाची जबाबदारी आहे.

Comments
Add Comment