Monday, May 5, 2025

ताज्या घडामोडीपालघर

ट्रॅक्टरच्या अपघातात तीन महिला जखमी

ट्रॅक्टरच्या अपघातात तीन महिला जखमी

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील डाहे येथून वाड्याच्या दिशेने प्रवासी घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरचा सकाळच्या सुमारास देवळी फाटा येथे अपघात झाला. अपघातात तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी डाहे येथे वाड्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी बसला हात केला असता बस थांबली नसल्याने, मागून येणाऱ्या ट्रॅक्टरला थांबवले व एकूण नऊ प्रवासी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून वाड्याच्या दिशेने निघाले. ट्रॅक्टर देवळी फाटा येथे ट्रॅक्टरची पुढची दोन्ही चाके अचानक निखळून पडली. चाके निखळून पडताच ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घुसला.

दरम्यान ट्रॅक्टरमधील प्रवासी लांब फेकले गेले. या अपघातात योगिनी रावते हिचा पाय ट्रॅक्टरखाली अडकल्याने ती जखमी झाली. तिच्या डोक्याला मार लागला. तर तुळसाबाई वरठा व संजना दोडके यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.

Comments
Add Comment