Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन

रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन ठाणे: ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार दिनांक ०८ जानेवारी, २०२२ ते सोमवार दिनांक १० जानेवारी,२०२२ पर्यत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे. रेल्वे विभागाकडून शनिवार दिनांक ०८ जानेवारी, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासुन ते सोमवार दिनांक १० जानेवारी, २०२२ रोजी पहाटे ०२.०० वाजेपर्यत अभियांत्रिकी कामांसाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी ५ मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात २३० बसफेऱ्या आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा या मार्गावर १० मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात १०२ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकिय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणुन सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Add Comment