
या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि देवीसिंग हा नटवर बनून गावात आला आहे. पण डिम्पलला पूर्ण खात्री आहे कि तो देवीसिंग आहे आणि त्यानेच सलोनीचा खून देखील केला आहे. त्यामुळे डिम्पल त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करतेय पण देवीसिंग तिच्या हाती काही लागू देत नाही आहे. त्या दोघांच्या पुरावे गोळा करण्याच्या या झटापटीमध्ये देवीसिंग डिम्पलचा काटा काढायचं ठरवतो. मालिकेत पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल कि देवीसिंग डिम्पलवर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिम्पल या सगळ्यातून सुखरूप वाचेल कि डिम्पलचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यातील भागात कळेल.