Monday, May 5, 2025

देशक्रीडाताज्या घडामोडी

विराट कोहलीचे कसोटी रँकिंग घसरले

विराट कोहलीचे कसोटी रँकिंग घसरले

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचे स्थान घसरण झाली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये तो सातव्या स्थानी फेकला गेला आहे. ‘टॉप टेन’ फलंदाजांमध्ये कोहलीसह उपकर्णधार रोहित शर्माचा समावेश आहे. आयसीसीच्या बुधवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळलेला विराटचे स्थान एका अंकाने घसरले आहे. तो सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी स्थिरावला आहे. भारताच्या कर्णधाराच्या खात्यात ७५६ गुण आहेत. रोहित शर्मा हा ७९७ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

यावेळच्या रँकिंगचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्लंडच्या मॅर्नस लॅबुशेनने अव्वल स्थानी घेतलेली झेप. त्याने अनुभवी संघ सहकारी आणि इंग्लिश कर्णधार ज्यो रूटला मागे टाकले आहे. अॅशेसमध्ये इंग्लंड संघ ०-२ असा पिछाडीवर पडला तरी लॅबुशेनची बॅट तळपली आहे. त्याने कारकिर्दीत प्रथमच पहिल्या स्थानी झेप घेत ९१२ गुणांची कमाई केली आहे. ज्यो रूट ८९७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

गोलंदाजीत अव्वल दहामध्ये एकमेव अश्विन अव्वल दहा गोलंदाजांमध्ये भारतातर्फे ऑफस्पिनर आर. अश्विनने पहिल्या दहा बॉलर्समध्ये स्थान राखले आहे. ताज्या क्रमवारीत ८८३ गुणांसह तो दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (९०४ गुण) आणि त्याच्यात २१ गुणांचा फरक आहे.

Comments
Add Comment